Marathi News> मुंबई
Advertisement

Video : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले

Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...

Video : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले

Ganpati Visarjan Viral Video : सोशल मीडियावरही सध्या गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्वीटर म्हणजे X वर अनेक गणेशोत्सवाचे व्हिडीओ पाहिला मिळत आहे. पाच, सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीला 11 दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात गणेशभक्तांना नाहक त्रास होऊ नये म्हणून चोवीस तास पोलीस सज्ज आहे. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तो पाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहे. 

बापासाठी धावला 'बाप्पा'

पोलीस हे मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. पोलीसमधील देवमाणसाचं दर्शन देणारा हा व्हिडीओ प्रत्येकांचं लक्ष वेधून घेत आहे. झालं असं की, घरगुती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी एक गणेश भक्त त्याच्या 5 महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन आला होता. बाप्पाला निरोप दिल्यानंतर तो बाप घरी जाण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सीला थांबवत होता. पण प्रत्येक टॅक्सीवाला त्याला नाही म्हणत होता. आता बाळाला भूक लागली होती तो रडत होता. तरीही कुठल्याही टॅक्सीवाला थांबत नव्हता. त्यात पावसामुळे आधीच अडचणी झाली होती. आता काय करायचं असा विचार करत असतानाच या बापासाठी बाप्पा धावला. 

माणसातला देव पाहून सारे भारावले

बाप हताश झाला होता आणि चिमुकला रडत होता, अशात मुंबई पोलिसांची एक गाडी तिथे आली. चिमुकल्याची आणि त्या माणसाची अवस्था पाहून ते त्यांच्या मदतीसाठी सरसावले. त्यांनी या गोंडस बाळाला आणि त्याचा वडिलांना आपल्या गाडीतून लिफ्ट दिली. एवढंच नाही तर अगदी त्यांना घरापर्यंत सोडलं. गाडी बसल्यावर त्या बाळाचं रडणं थांबलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हा व्हिडीओ त्या व्यक्तीने आपल्या अधिकृत ट्विटरवर म्हणजे  'X' वर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतोय. आता हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो व्हायरल होतो आहे. 

वडिलांनी मानले आभार!

त्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओला शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की,  'आम्ही चर्नी रोड स्टेशनवर होतो. पाऊस पडत होता. गणेश विसर्जनामुळे एकही टॅक्सीचालक जाण्यास तयार नव्हता. माझा 5 महिन्यांचा मुलगा रडत होता. अशात मुंबई पोलिसांनी आम्हाला मदत केली आणि destination पर्यंत पोहोचवलं. 

Read More