Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईत मोठी कारवाई, 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त; टोळीचा पर्दाफाश

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2000 च्या बनावट भारतीय चलनातील नोटांसह ( fake Indian currency notes) 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईत मोठी कारवाई, 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त; टोळीचा पर्दाफाश

प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2000 च्या बनावट भारतीय चलनातील नोटांसह ( fake Indian currency notes) 7 जणांना अटक केली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक टोळी बनावट नोटा छापून त्यांचे वितरण करत होते. बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीतील साज जणांना दहिसर नाक्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईत भारतीय चलनाच्या (ndian currency) बनावट नोटा ( fake notes ) छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून सात कोटी रुपयांसह सात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत. 

मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून रोजच्या व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. चार व्यक्ती 2000 रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या व्यक्तीची झडती घेतल्यानंतर मोठे रॅकेट उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांना 31 जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यांच्या गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये 2000 रुपयांच्या नोटांचे 250 बंडल आढळून आलीत. आरोपींची अधिक झडती घेतल्यानंतर पोलिसांना आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आणि  सुमारे 28000 रोख रक्कम सापडली.

Read More