Marathi News> मुंबई
Advertisement

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आयुक्तांचे निर्देश

आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्यावीत, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालने दिले आहेत. 

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आयुक्तांचे निर्देश

मुंबई : बृहन्‍मुंबई हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्यावीत, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालने दिले आहेत. दहशतवादी आणि काही असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत.

कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचण्याच्या शक्यता गृहित धरुन फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ च्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १० (२) कलम जारी केले आहे. त्यानुसार आपल्याकडे भाडेकरु ठेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही घरमालकाने संबंधित भाडेकरुची संपूर्ण माहिती हद्दीतील पोलीस ठाण्यात सादर केल्याशिवाय आपले घर भाड्याने देऊ नये. तसेच भाडेकरुनेही आपली माहिती विहीत नमुन्यात पोलीस ठाण्यास द्यावी. मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांनीही याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे, असे आपल्या निर्देशात पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

दरम्यान, विदेशी नागरिकास भाडेकरु म्हणून ठेवायचे असल्यास संबंधित विदेशी नागरिकाचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्रमांक, पासपोर्ट दिल्याचे ठिकाण आणि तारीख, पासपोर्ट वैधतेची मुदत, व्हिसा क्रमांक, वर्गवारी, दिल्याचे ठिकाण आणि तारीख, व्हिसा वैधतेची मुदत आदी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कारवाईस पात्र राहील, असेही बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Read More