Marathi News> मुंबई
Advertisement

मी नाराज नाही- पंकजा मुंडेंचा खुलासा

या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीयं. 

मी नाराज नाही- पंकजा मुंडेंचा खुलासा

मुंबई : उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त येतंय. या बैठकीतून त्या नाराज होऊन बाहेर पडल्याचं सांगण्यात येतंय. सभागृहात विधेयक मांडल जात असताना भाजपा आमदारांचीची भूमिका काय असणार ? आमदार आणि मंत्र्यांनी नेमकं केव्हा बोलावं ? याबद्दलही रणनीती ठरवली जाणार होती. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंकजा मुंडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय. दरम्यान या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीयं. 

'घूसखोरी नाही'

 मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत घूसखोरी केली नसल्याचा दावा ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. आपण बैठकीत प्रवेश केला असल्याची केवळ अफवा असल्याचा दावा त्य़ांनी केला. मराठा आरक्षणाला आपला आधीपासूनच पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

'मराठा समाज आरक्षण उपसमितीमध्ये मी नाही, त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे' त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तावातावानं बैठकीत 

उपसमितीची बैठक सुरू असताना पंकजा मुंडे या तावातावानं बैठकीत गेल्या आणि मराठा आरक्षणाच्या टक्केवारीबाबत त्यांनी उपसमितीच्या सदस्यांना विचारणा केल्याची चर्चा रंगली होती.

त्यानंतर तातडीनं पंकजा मुंडे यांनी याबाबत खुलासा करत असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं. मात्र त्या माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजनही त्यांच्यासोबत होते. 
 

Read More