Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai News : मुंबईत पाणीबाणीचे संकेत; 'या' महिन्यापासून 10 ते 20 टक्के पाणी कपात?

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी पाणी पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्या पाहता पाणीकपातीचं संकट घोंगावतंय.  

Mumbai News : मुंबईत पाणीबाणीचे संकेत; 'या' महिन्यापासून 10 ते 20 टक्के पाणी कपात?

Mumbai Water Cut : सध्या थंडीचा मोसम असला तरी मुंबईकरांवर पाणीसंकट घोंगावतंय. मुंबईची तहान भागवणाऱ्या सात तलावांचा पाणीसाठा पाहता मुंबईकरांवर पाणीकपाताची संकट ओढावलाय. त्यामुळे मुंबईकर पाणी जपून वापरा. मुंबईला महानगरपालिकेकडून अप्पर वैतरणा,  मोडकसागर,  तानसा,  मध्य वैतरणा,  भातसा,  विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठी पाहता तो सध्या निम्म्यावर आला आहे. गेल्यावर्षी 12 फेब्रुवारीला पाणीसाठी पाहता तब्बल 20 दिवसांचा पाणीसाठा कमी झाल्याचा समोर आला आहे. तर बाष्पीभवनामुळे दरवर्षी जूनमध्ये होणारी पाणीकपात आता भर उन्हात मे महिन्यातच लागू होण्याची भीती वर्तवल्यामुळे मुंबईकरांना थंडीच घाम फुटला आहे. त्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर मान्सून सक्रीय होण्यास विलंब झाला तर मुंबई महापालिकेला जून, जुलैमध्येही10 ते 20 टक्के पाणी कपात करावी लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Mumbai News Signs of water crisis in Mumbai 10 to 20 percent water reduction from this month)

मुंबईवर असलेल्या या पाणीकपातीच्या चिंतेमुळे पालिका पाणीपुरवठ्याचे कसे नियोजन करते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागलाय. मुंबईकरांना वर्षभर पाणीपुरवठा राहण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबरला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. 

 

Read More