Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral

Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

 Mumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral

Mumbai Local Viral Video : मुंबईल लोकल ट्रेन आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या एका व्हिडीओने मुंबईकरांची झोप उडवली आहे. मुंबईतील परळ रेल्वे स्थानकावर एका नराधमाने संतापजनक लज्जास्पद कृत्य केलं आहे. 

विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य

परळ स्टेशनवर गुरुवारी 13 एप्रिल 2023 ला ऑफिसमधून घरी जाण्यासाठी आली होती.  प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर महिला डब्यासमोर ती उभी असताना तिथे एक व्यक्ती आला. त्या विकृत व्यक्तीने पँटची झिप उघडली आणि हस्तमैथुन करायला लागला. हे पाहून तरुणीला धक्का बसला. त्या तरुणीने हिम्मतीने हे धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं. 

ती तरुणी पोलिसांना फोन लावतच होती की तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेन आली आणि तो विकृत व्यक्ती लोकल पकडून फरार झाला. 

या तरुणीने हा व्हिडीओ ट्विटर करुन पोलिसांना यासंदर्भात तक्रार केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.  सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत असं कृत्य करण्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी जोर धरत आहे. 

त्या ट्वीटरला सेंट्रर रेल्वे आरपीएफने उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या प्रकराची चौकशी होईल. त्या तरुणीने ट्वीट केल्यानंतर अजून एका व्यक्तीने या घटनेला दुजोरा दिला आहे. 

fallbacks

तुम्हाला या विकृत व्यक्ती कुठे दिसल्यास पोलिसांना नक्की संपर्क करा. 

Read More