Marathi News> मुंबई
Advertisement

Lata Mangeshkar Death Anniversary : कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचे नाव द्या; मंगेशकर कुटुंबियांची मागणी

Lata Mangeshkar : सोमवारी हाजीआली येथे लतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले. भारतरत्न असलेल्या लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी मंगेशकर कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.

Lata Mangeshkar Death Anniversary : कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचे नाव द्या;  मंगेशकर कुटुंबियांची मागणी

Coastal Road : मुंबई महापालिकेचा (BMC) महत्त्वांकाक्षी असलेला कोस्टल रोड (coastal road) प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. समुद्रात भराव टाकून हा रस्ता तयार केला जात असून, वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे आता कोस्टल रोडला लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे नाव द्या अशी मागणी मंगेशकर कुटुंबीयांनी दिली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे (Lata Mangeshkar Death Anniversary). त्यामुळे आजच्याच दिवशी मंगेशकर कुटुंबियांकडून ही मागणी करण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त हाजीअली चौक येथे लतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित आहेत. यासोबत अभिनेते शिवाजी साटम यांच्यासह अन्य कलाकारही उपस्थित होते. स्वरांचा कल्पवृक्ष असे नाव असलेल्या स्मारकाची निर्मिती स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या स्थानिक विकास निधीतून व महानगरपालिकेच्यावतीने होणार आहे. चाळीस फूट उंची असलेल्या या स्मारकाचे बांधकाम तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

उषा मंगेशकर यांनी केली मागणी

"महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मोठा प्रकल्प होतोय आणि तो आमच्या घराजवळच बनत आहे. त्यामुळं याला दीदींच नाव द्यावं अशी आमची इच्छा आहे. मंगलप्रभात लोढा हे या प्रकल्पाच्या कामात सक्रिय आहेत. महानगर पालिकाही आमच्यासोबत आहे. त्यामुळे याला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावं असे आम्हाला वाटत आहे आणि ते होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे," असे उषा मंगेशकर म्हणाल्या.

दक्षिण मुंबईला जोडणारा 9.98 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडसाठी 12 हजार 950 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी प्रियदर्शिनी पार्क ते चौपाटी दरम्यान 12.19 मीटर व्यास आणि 2.070 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे लक्ष्य आहे.

Read More