Marathi News> मुंबई
Advertisement

CCTV: कॉलेज विद्यार्थ्यांची गुंडगिरी, कॉलेजच्या गेटवरच विद्यार्थ्याला जबर मारहाण

धक्कादायक म्हणजे पोलिसांनी तक्रारदारालाच आरोपींचे पत्ते शोधून आणायला सांगितलं

CCTV: कॉलेज विद्यार्थ्यांची गुंडगिरी, कॉलेजच्या गेटवरच विद्यार्थ्याला जबर मारहाण

मुंबई : मुंबईतल्या कांदिवली इथल्या एका नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला १० ते १५ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मारहाण करणारे विद्यार्थीदेखील याच कॉलेजमधले असल्याचा दावा जखमी विद्यार्थ्याने केला आहे.

युवराज चौरसिया असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. युवराज वाणिज्य शाखेत बारावीत शिकतो. १० मार्चला कॉलेजच्या बाहेर काही विद्यार्थी घोळका करुन उभे होते, त्यावेळी युवराजने त्यांना थोडसं बाजूला होण्याची विनंती केली. यावरुन घोळक्यातील एका विद्यार्थ्याने त्याला शिविगाळ केली. यातून युवराज आणि त्या टोळक्यामध्ये वाद झाला. वादाचा पर्यावसन हाणामारीत झालं. त्या टोळक्याने युवराजला बेदम मारहाण केली.

मारहाण करणारी मुलं याच कॉलेजमध्ये तेरावी आणि चौदावीत शिकणारे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. हाणामारीची माहिती मिळाल्यानंतरही कॉलेजकडून कोणतंही कायदेशीर पाऊल उचलण्यात आलेलं नाही. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी तक्रारदारालाच आरोपींचा पत्ता शोधून आणण्यास सांगितलं, यानंतर अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवण्यात आला.

कॉलेज सुटल्यानंतर युवराजने आपल्या पालकांना घडलेली घटना सांगितली. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

Read More