Marathi News> मुंबई
Advertisement

राज ठाकरेंचा आदेश आणि हनुमान चालिसाचा 'आवाज' भाजपा असा वाढवणार

राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाच्या आदेशाचा 'आवाज' भाजपा असा वाढवणार

राज ठाकरेंचा आदेश आणि हनुमान चालिसाचा 'आवाज' भाजपा असा वाढवणार

मुंबई : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हनुमान चालिसाचं राजकारण तापणार आहे.  मशिदीवरील भोंग्यांना मनसेनं हनुमान चालिसानं उत्तर दिल्यानंतर आता भाजपनंही यात उडी घेतली आहे. 

3 मेपर्यंत मिशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचली जाईल अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली. त्यातच  उदया पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या त्यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालिसाचं सामूहिक पठण देखील होणार आहे.

मनसेच्या भूमिकेबाबत आता भाजपनेही सूरात सूर मिसळला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील मंदिरांत मोफत भोंग्यांचं वाटप सुरु केलं आहे. हनुमान जंयती निमित्त मुंबईतील मंदिरांमध्ये 1 हजाराहून अधिक भोंगे वाटप केले जातील असं कंबोज म्हणाले.

आणखी अर्ज आल्यास त्याची पडताळणी करुन त्यांना सुद्धा भोंगे दिले जातील, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी आम्ही हे करत असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे. 
 
त्यामुळे उद्या हनुमान जयंतीला राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Read More