Marathi News> मुंबई
Advertisement

आताची मोठी बातमी! जयंत पाटील यांची ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी

आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटलांची आज ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. चौकशीला जाण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. जयंत पाटील बाहेर आल्यानंतरही शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.

आताची मोठी बातमी! जयंत पाटील यांची ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी

Jayant Patil ED Inquiry : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची ईडीने (ED) तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. जयंत पाटील सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात (Mumbai ED Office) गेले होते. त्यानंतर 9.30 वाजता ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात गेले. तिथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपण समाधानकारक उत्तरं दिली, आपण कोणतंही चुकीचं काम केलं नाही असं पाटील यांनी सांगतिलं. .मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडलं. आता त्यांच्याकडे काहीही प्रश्न शिल्लक असतील असं मला वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटलांची आज ईडीने चौकशी केली. L&FS कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. IL&FS प्रकरणात एकाच व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली? कंत्राटं मिळालेल्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा संशय आहे. जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचाही आरोप आहे.  तसंच IL&FS प्रकरणात याआधी अनेकांची नावं समोर आलीत. या प्रकरणाच्या तपासासाठी जयंत पाटलांची ईडी चौकशी करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन
चौकशीला जाण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. जयंत पाटील ईडी ऑफिसमध्ये (ED Office) जाण्याआधी पक्ष कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. पक्ष कार्यालयात काही काळ घालवल्यानंतर जयंत पाटील ईडी चौकशीसाठी रवाना झाले. राष्ट्रवादीचं कार्यालय ते ईडी ऑफिसपर्यंत ते पायी चालत गेले. जयंत पाटलांच्या ईडी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी मुंबईतलं पक्ष कार्यालय आणि ईडी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. तर राज्यभरातही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

शरद पवारांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची (Jayant Patil) सुरू असलेल्या ईडी चौकशीबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केलंय. सत्ताधा-यांना राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा असण्याची शक्यता आहे. मात्र आमची त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची मुळीच तयारी नाही. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजू मात्र आम्ही आमचा मार्ग सोडणार नसल्याचा सज्जड इशाराच पवारांनी दिलाय. 

Read More