Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई महापालिका निवडणूक : राज ठाकरे यांचा निवडणुकीबाबत मोठा निर्णय

Raj Thackeray's big decision regarding elections : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) निवडणुकीच्या तयारीला जोरदार लागली आहे. त्यासाठी आढावा बैठकीवर जोर देण्यात येत आहे.  

मुंबई महापालिका निवडणूक : राज ठाकरे यांचा निवडणुकीबाबत मोठा निर्णय

मुंबई : Raj Thackeray's big decision regarding elections : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) निवडणुकीच्या तयारीला जोरदार लागली आहे. त्यासाठी आढावा बैठकीवर जोर देण्यात येत आहे. या बैठकीत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबतची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे. आम्हाला राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.

मनसे आता कमिटी स्थापन करुन बैठका घेणार आहेत. गटाध्यक्ष यांच्या बैठक होणार आहेत. 15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा निहाय अहवाल देणार आहोत. युतीबाबात पडू नका, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यांनी स्वतंत्र्य लढण्याचे आदेश दिले आहेत, असे संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेने वॉर्ड रचना जरी बदलली तरी लोकांची नाराजी बदलणार नाही. शिवसेनेसोबत मराठी माणसं , हिंदू लोकं आहेत  का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कितीही वॉर्ड रचना बदलल्या तरी आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत. पण मरण अटळ आहे, असे शिवसेनेला देशपांडे यांनी टोला लगावला.

देशपांडे मीडियाशी बोलताना म्हणाले, तुमच्या मनात विषय येत असेल युतीच काय होणार ? युती होईल की नाही ते पुढे बघू तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. युतीच्या चर्चेत पडू नका. निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागा. विधानसभा निहाय कमिटी नेमली जाणार आहे. ही कमिटी अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर लोकसभा निहाय राज ठाकरे स्वतः आढावा घेणार आहेत. 

Read More