Marathi News> मुंबई
Advertisement

करिअर बनवण्याच्या नावाने मुंबईत मॉडेलवर बलात्कार, अभिनेता जॅकीसह, ९ जणांवर एफआयआर

9 हायप्रोफाईल लोकांविरूद्ध बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करिअर बनवण्याच्या नावाने मुंबईत मॉडेलवर बलात्कार, अभिनेता जॅकीसह, ९ जणांवर एफआयआर

मुंबई : मुंबईतील चमचमत्या दुनियेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील 9 हायप्रोफाईल लोकांविरूद्ध बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मॉडेलने बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर  आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्यासह अनेकांवर विनयभंग आणि बलात्काराचा आरोप केला आहे. फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन याच्याविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेलने आरोप केला आहे की, मॉडेलिंगमध्ये मोठी संधी देण्याच्या नावाखाली कोलस्टन ज्युलियनने 2014 ते 2018 दरम्यान तिच्यावर बलात्कार केला आहे.

मॉडेलने फोटोग्राफर तसेच क्वान एन्टरटेनमेंटचे संस्थापक अनिरबान ब्लाह, अभिनेता जॅकी भगनानी, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णू वर्धान इंदुरी यासगळ्या हाय प्रोफाईल लोकांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काम देण्याच्या नावाखाली मॉडेलची छेडछाड!

मॉडेलचा आरोप आहे की, अभिनेता जॅकी भगनानीने वांद्रे येथे तिची छेडछाड केली, तर निखिल कामतने सांताक्रूझमधील फाइव स्टार हॉटेलमध्ये, शील गुप्ताने 2015 मध्ये अंधेरी येथील एका इमारतीत तिचा विनयभंग केला असल्याचे मॉडलने तिच्या FIR मध्ये सांगितले.

तसेच मॉडेलचा आरोप आहे की, अजित ठाकूरने 2018 मध्ये विलेपार्ले येथील इमारतीत तिच्यावर बलात्कार केला. मॉडेलच्या तक्रारीनंतर सर्व आरोपींवर आईपीसी कलम 378 (एन), 354 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More