Marathi News> मुंबई
Advertisement

Video : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य

Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं. 

Video : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य

Mumbai Metro Video : मुंबईकरांसाठी लोकल ही त्यांची (mumbaikar local Life line) लाइफ लाइन आहे. लोकल सोबतच मेट्रोने (mumbai Metro) पण आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला आहे. सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेन (Local train news) असो किंवा मेट्रोचे अनेक व्हिडिओ (video viral) पाहिला मिळतात. लोकल ट्रेनमधील मुंबईकरांची दुनिया दाखवणारे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहिला मिळतात. अनेक जण हा अनुभव स्वत: ही कधी कधी अनुभवलेला असतो. कधी महिलांच्या डब्बात हळदीकुंकू तर कधी गरबा डान्स तर कधी कधी तर एका सीटवरुन महिलांची होणारी हाणामारी (Women fights video)...असाच एक मेट्रोमधील व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

मजेदार व्हिडिओ

मेट्रो असो किंवा लोकल यामध्ये सोशल मीडियासाठी आजची तरुण पिढी आपल्याला रील्स बनवताना दिसते. मेट्रोमध्ये टॉवेल घातून एक तरुण चढला होता त्यानंतर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला होता. आता या व्हिडिओमध्ये एक तरुण प्रवास करत असताना खूप थकलेला दिसतं आहे. त्याचा डोळा लागतो आणि तो सीटवरुन तोल जात होता. हे त्याचा शेजारी बसलेल्या तरुणीच्या लक्षात येतं ते इकडे तिकडे बघते. तेवढ्यात तो तरुण खाली पडणारच हे लक्षात येतात त्या तरुणीने त्याचा टीशर्ट पकडला...पण तो सीटवरुन खाली पडतो. त्याचा शेजारी असणारा दुसरा तरुण त्याला परत सीटीवर बसण्यासाठी मदत करतो. (mumbai Metro Young man sleeps and girl does this with him video viral on Social media)

 

हेसुद्धा वाचा - Video : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवेल गुंडाळून Metro मध्ये...


व्हिडिओ व्हायरल

लोकल ट्रेन (mumbai local news), मेट्रो (metro video) किंवा मोनोमधून (Mono news) प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसोबत कधी ना कधी असा प्रसंग घडला आहे.

प्रवासामध्ये लागणारा वेळ आणि कामामुळे अनेकांना प्रवासादरम्यान झोप लागते. मग अशावेळी अनेक मुंबईकर त्यांना ज्या स्टेशनवर उतरायचं असतं त्याचाही पुढे निघून जातात. तुमच्याही सोबत असं कधी ना कधी घडलं असेल ना...हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामच्या mdmoeenshaikh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आले आहेत. 

 

Read More