Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई मेट्रो तीन प्रकल्प : भुयारीकरणाचा तेरावा टप्पा पूर्ण

मुंबई मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा आज पूर्ण झाला.  

मुंबई मेट्रो तीन प्रकल्प : भुयारीकरणाचा तेरावा टप्पा पूर्ण

मुंबई : मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा आज पूर्ण झाला. एमएमआरसीअंतर्गत मेट्रोच्या प्रस्तावित विधानभवन स्थानकाजवळचं भुयारीकरण पूर्ण झालंय. कफपरेड मेट्रो स्थानकापासून ते विधानभवन हे सव्वा किलोमीटरचं भुयारीकरण २०५ दिवसात पूर्ण करण्यात आले आहे. 

मुंबई मेट्रो ही शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी मुंबई मेट्रोचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार अनेक मेट्रो प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. घाटकोपर ते वर्सोवा असा पहिला टप्पा सुरु झाला. त्यानंतर अनेक टप्पे सुरु करण्यात आले आहे.

जून २००६ मध्ये भारताचे पंतप्रधान, श्री. मनमोहन सिंह, यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले.

Read More