Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय

Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे. 

Mumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय

Mumbai Metro Monthly Pass: मुंबई मेट्रोने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना मुंबई मेट्रोने मोठं गिफ्ट दिलं आहे. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (MMMOCL) 'मुंबई 1' कार्डचा वापर करून मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सवलत (Discount) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 30 दिवसांच्या कालावधीत 45 वेळा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 15 टक्के सुट तर 60 वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 20 टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत 30 दिवसांच्या कालावधीसाठी मर्यादित असून त्याचं शुल्क 'मुंबई 1' कार्डच्या माध्यमातून प्रीपेड (Prepaid Card) स्वरूपात आकारला जाणार आहे. 

अमर्याद ट्रीप पास
याशिवाय मुंबई मेट्रोच्या माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणी भेट देणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी 'अमर्याद ट्रीप पास' (Unlimited trip pass) ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार एक दिवसाचं अमर्याद ट्रीप पासचं शुल्क 80 रुपये, तर 3 दिवसांच्या अमर्याद ट्रीप पासचे शुल्क 200 रुपयं इतकं असणार आहे. 

कसं मिळवाल 'मुंबई 1' कार्ड
मुंबई मेट्रोचे प्रवासी त्यांचे 'मुंबई 1' हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मुंबई मेट्रोच्या तिकीट काऊंटर आणि कस्टमर केअर काउंटरवर अल्प कागदपत्रांसह सहज मिळवू तसंच रिचार्ज करू शकतात. या कार्डचा वापर रिटेल स्टोअरमध्ये आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील करता येणार आहे. 

काय आहेत या सुविधेची वैशिष्ट्य
-  45 आणि 60 ट्रीप पास हा खरेदीच्या तारखेपासून 30 दिवसांसाठी वैध राहील

- अनलिमिटेड ट्रीप पास – 80 रुपये (वैधता 1 दिवस), 200 रुपये (वैधता 3 दिवस)

-  1 ट्रीप – एकेरी प्रवास

- पास नुसार मुंबई मेट्रोने प्रवास हा केवळ पासमध्ये निश्चित केलेल्या गंतव्य स्थानकांदरम्यानच्या प्रवासासाठी मर्यादित असतील

-  मुंबई 1 कार्ड हरवल्यास कर्डमधील शिल्लक रक्कम ही परत मिळवता येणार नाही

- मुंबई 1 कार्ड खराब झाल्यास, काम करत नसल्यास अथवा हरवल्यास नवीन कार्डासाठी रुपये 100 इतके शुल्क आकारले जातील

- ट्रीप पासेस फक्त 'मुंबई 1' नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी वैध आहेत

मुंबईत मेट्रोचं जाळं
मुंबईत हळूहळू मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. घाटकोपर ते वर्सोवा हा मेट्रो 1 चा पहिला टप्पा असून या मार्गावर लाखो प्रवासी प्रवास करतात. याशिवाय मेट्रो 2 अ हा दहिसर ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो-7 दहिसर पूर्व ते गुंदवी असा तिसरा मेट्रो मार्ग आहे. हे तीनही मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवास आणखी सुकर होणार आहे. मेट्रो 2 अ आणि मेट्रो-7  मार्ग सुरु झाल्याने रस्ते वाहतूकीवरचा ताणही कमी झाला आहे. 

Read More