Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांनो! 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Mega Block : तुम्ही जर विकेंडला बाहेर पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा. कारण आज मुंबई उपनगरीय मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे. 

मुंबईकरांनो! 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Mega Block Marathi : मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची जिवनवाहीनी...एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल सोयीस्कर ठरते. स्वस्त आणि वेळेत प्रवास होण्यासाठी लोकलला जास्त पसंती मिळते. जर तुम्हीही विकेंडच्या दिवशी बाहेर पडणार असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक नक्की तपासून घ्या. कारण रविवारी (4 फेब्रुवारी) मुंबई उपनगरीय मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

 रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती आदी विविध कामांसाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात काही लोकल उशीर धावतील तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या काळात लोकल गाड्या सीएसएमटी-विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा,  सायन आणि कुर्ला या स्थानकात लोकल थांबतील. घाटकोपर स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 

ट्रान्सहार्बर मार्ग

ठाणे ते वाशी/नेरळ अप आणि डाऊन मार्ग या ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉकची कामे करण्यात येणार आहे. तर ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द असणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर

पश्चिम मार्गावर ही रेल्वे संबंधित कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेन बोरिवली ते अंधेरी अप आणि गोरेगाव ते बोरिवली डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.  हा ब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉकदरम्यान बोरिवली आणि अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

ठाणे-मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर ठाणे ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यावेळी मुलुंड स्थानकावरी येथील जुना पादचारी पूल काढण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री 9.54 वाजताची सीएसएमटी-कल्याण लोकल आणि रात्री 11.05 वाजताची कल्याण-सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे. 

Read More