Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोअर परेलचा डिलाईल रोड ओव्हर ब्रिज धोकादायक

लवकरच हा पूल तोडून नवा बांधण्यात येणार आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोअर परेलचा डिलाईल रोड ओव्हर ब्रिज धोकादायक

मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.... लोअर परेलचा डिलाईल रोड ओव्हर ब्रिज धोकादायक घोषित करण्यात आलाय. उद्या (मंगळवार, २४ जुलै) सकाळपासून हा पूल वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अंधेरीला पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतल्या सगळ्या पुलांचं ऑडीट करण्यात आलं.

पूलाचे बांधकाम नव्याने होणार

आयआयटी मुंबई, पालिका अधिकारी आणि रेल्वेने या पुलाची तपासणी केल्यानंतर हा पुल धोकादायक असल्याचं समोर आलं, त्यानंतर हा पुल पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लवकरच हा पूल तोडून नवा बांधण्यात येणार आहे.

Read More