Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'त्या' व्यक्तीचं धक्कादायक कृत्य, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. Norway च्या The Quick Style ग्रुपचा मुंबई लोकल ट्रेनमधील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर व्हायरल (Social media Trending now) झाला होता. त्यानंतर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. (Mumbai News)

Mumbai Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'त्या' व्यक्तीचं धक्कादायक कृत्य, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांची (Mumbai News) एक वेगळीच दुनिया असते. भजन किर्तनपासून डान्सपर्यंत, सीटवरुन महिलांची हाणामारी ते भाजी निवडण्यापर्यंत...अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होतं असतात. सध्या सोशल मीडियावर नॉर्वेमधील (Norway Dance Group) डान्स ग्रुप 'The Quick Style' चा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. (Mumbai local train viral video) 

पण याच लोकल ट्रेनमधील एक धक्कादायक (mumbai local news) चित्र समोर आलं. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सर्वांसमोर मद्यपान करताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on Social media ) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्या व्यक्तीवर कडक कारवाईची मागणी करत आहेत. (Mumbai Local man drinking alcohol video viral on Social media Trending now)

व्हिडीओ व्हायरल 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोकल ट्रेनमधील डबात एक व्यक्ती खिडकीजवळ बसला आहे. त्याचा हातात काळा रंगाची पॉलिथिन बॅग आहे. ज्यात त्याने दारूची बाटल ठेवली आहे. तो सर्वांसमोर खिडकीत बसून फोनवर बोलत बोलत दारु पिताना दिसतं आहे. 


हा व्हिडीओ ट्वीटरवर S¥NDICATE या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या यूजर्सने मुंबई पोलिसांना या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याने लिहिलं आहे की, दोन दिवसांपूर्वी मी लोकल ट्रेनमधून वडाळा रोड ते पनवेल स्टेशनपर्यंत प्रवास करत होतो. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. यावर मुंबई पोलीस कारवाई करणार का? लोकलमध्ये दारु पिणे कायदेशीर आहे का? मुंबई पोलीस काय कारवाई करणार? 

मुंबई लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरुन रोज लाखो लोक प्रवास करतात. पहाटे लवकर उठणारी आणि रात्री उशिरापर्यंत धावणारी लोकल ट्रेन ही मुंबईकरांचा श्वास आहे. त्यामुळे अशा प्रकारचे धक्कादायक कृत्य कोणालाही मान्य नाही. 

Read More