Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईच्या रस्त्यांवर धावणार हायब्रिड बस

हायब्रीड बसेसचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं. एकूण 25 हायब्रीड बस आजपासून मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. 

 मुंबईच्या रस्त्यांवर धावणार हायब्रिड बस

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर आजपासून हायब्रिड बस धावणार आहे. एमएमआरडीएनं खरेदी केलेल्या हायब्रीड बसेसचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं. एकूण 25 हायब्रीड बस आजपासून मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. 

15 ते 100 रुपये असे तिकीट दर

31 आसन क्षमता असलेल्या या बसेस बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते नवी मुंबई, ठाणे, कांदीवली अशी धावणार असून 15 ते 100 रुपये असे तिकीट दर असणार आहे. या बसमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा असून ही बस बैटरी आणि डिझेलवर चालणार आहे. 

25 बसेसच्या खरेदीसाठी एकूण 50 कोटी खर्च

'मेक इन इंडिया' अंतर्गत या बसेससाठी केंद्र सरकारकडून 15 कोटी मिळाले असून 25 बसेसच्या खरेदीसाठी एकूण 50 कोटी खर्च आला आहे. MMRDA या बसेस या बेस्ट कडे चालवण्यासाठी देणार आहेत.

या बसेसमुळे प्रदुषण कमी होईल याचबरोबर भविष्यात 100%  बस वाहतूक ही इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न सरकार करेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Read More