Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai Crime : एक फोन, 350 पुरुष आणि 'ती'; हॉटेलच्या रुममध्येच फुटलं बिंग

Mumbai Crime: मुंबईत तब्बल 350 जणांना असाच फोन किंवा मेसेज आलाय आणि एका तरुणाच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आलाय

Mumbai Crime : एक फोन, 350 पुरुष आणि 'ती'; हॉटेलच्या रुममध्येच फुटलं बिंग

Mumbai Crime: गेल्या काही दिवसांपासून देशभरात ऑनलाईन फसवणूकीचे (online fraud) प्रकार झपाट्याने वाढतायत. यामध्ये सेक्सटॉर्शनला (Sextortion) बळी पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. एकटेपणा घालवण्यासाठी अनेक जण या ऑनलाईन मैत्री (online friendship) करण्याकडे वळतात आणि त्यांची फसवणूक होते. असाच काहीसा प्रकार मुंबईत सुरु आहे. फ्रेन्ड्स ग्रुपच्या (friend group) नावाखाली तब्बल 350 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. (mumbai gang duped around 350 people on the pretext of working as mail escorts)

मेल एस्कॉर्ट्स (male escort) म्हणून काम देतो असे सांगून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील जवळपास 350 जणांची एका टोळीने फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर नावाची बदनामी होईल या भीतीने कोणी पुढे येणार नाही असा विश्वास या टोळीला होता. मात्र एका तरुणाने पुढे येत या टोळीचा पर्दाफाश केलाय. तरुणाच्या तक्रारीनंतर अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा >> अचानक न्यूड व्हिडीओ कॉल येण्याचं प्रमाण वाढलं

कशी होतेय फसवणूक?

ही टोळी तरुणांना पैसे देऊन फ्रेंडशिप ग्रुप्सचे सदस्य होण्याचे आमिष दाखवत होती. टोळी या तरुणांना तु्म्हाला मेल एस्कॉर्ट्स बनून महिला ग्राहकांसोबत वेळ घालण्यासाठी तुम्हाला फक्त हॉटेलमध्ये जावे लागेल असे सांगायची. त्यानंतर त्या तरुणाला क्लायंटला खुश करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करून भेटवस्तू खरेदी करण्यास सांगितले जायचे. पैसे भरल्यानंतर, ती व्यक्ती हॉटेलमध्ये त्या खोलीत जायची. पण एकतर खोली रिकामी असायची किंवा त्यात दुसरे कोणीतरी असायचे.

हे ही वाचा >> अजून एक जमताडा! राजस्थानमधलं हे गाव करतं देशभरात सेक्सटॉर्शन...

असा झाला उलगडा

एका पीडित व्यक्तीने धाडस दाखवून पोलिसांना माहिती दिल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. त्याने पोलिसांना सांगितले की एका टोळीने त्याच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. यामध्ये त्यांनी मला गीता फ्रेंडशिप क्लब, ऋषी फ्रेंडशिप क्लब आणि नीता स्पा फ्रेंडशिप क्लब या तीन ग्रुपमध्ये सामील केले. दोन महिन्यांच्या सर्व्हिससाठी 1,500 रुपये आणि आणखी 1,500 रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले होते.

"गेल्या आठवड्यात मला थ्री स्टार हॉटेलमध्ये जाण्यास सांगण्यात आले. यावेळी ऑनलाइन पेमेंट देऊन 6,500 रुपयांचे बॉडी मसाज किटचे गिफ्ट खरेदी करण्यास सांगण्यात आले. पेमेंट केल्यावर क्लबकडूनच हॉटेल रूममध्ये हे किट दिले जाईल असे त्यांनी सांगितले. यासोबत खात्री पटवण्यासाठी हॉटेलच्या बाहेरुन लाइव्ह फोटो देखील पाठवायला सांगितला. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी डिपॉझिट म्हणून 11 हजार रुपये जमा करण्यास सांगितले होते. ही रक्कम परत मिळेल असेही त्यांनी सांगितले," असे या तक्रारदार तरुणाने म्हटलंय.

हे ही वाचा >> बेस्ट चालकाच्या पत्नीला Instagramवरील मित्राने पाठवलेलं गिफ्ट पडलं महागात

"तक्रारकर्त्याला या टोळीकडून, जर तो क्लबचा सदस्य झाला तर त्याला विविध हॉटेलमध्ये महिलांना मसाज करण्यासाठी पाठवले जाईल ज्याचे त्याला 30,000-40,000 रुपये मिळतील असे सांगितले गेले. त्याला असेही सांगण्यात आले की त्याला क्लबला 20% रक्कम द्यावी लागेल. मात्र तक्रारदार आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येण्यापूर्वीच सुमारे 20,000 रुपये देऊन बसला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

"त्याच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तांत्रिक मदतीने, मनी ट्रेलवर जाऊन बँक खात्याचा शोध घेतलाय. खातेदाराचे नाव अभिषेक सिंग असे होते. आम्ही त्याला अटक केली. चौकशीदरम्यान अभिषेकने त्याच्या सुजित अनिल सिंग, छोटू सिंग आणि किरण सिंग या साथीदारांची नावे सांगितली. आम्ही छोटूच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली, तर इतर फरार आहेत," असे पोलिसांनी सांगितले.

Read More