Marathi News> मुंबई
Advertisement

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? मुंबईत 8 जणांना दीड कोटींचा गंडा, नेमकं काय प्रकरण?

Mhada Crime News : मुंबईत हक्काचे घर असणं असं अनेकांचं स्वप्न असतं. काहीना पैसे अभावी शक्य होत नाही तर काहीजणांना म्हाडाची लॉटरी लागत. त्यामुळे अशा लोकाचं मुंबईत म्हाडाचं घर हे स्वप्नच राहून जातं.  

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? मुंबईत 8 जणांना दीड कोटींचा गंडा, नेमकं काय प्रकरण?

Mumbai Mhada News In Marathi : मुंबईत घर ते पण महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे (म्हाडा) घर मिळवण्यासाठी अनेक जण अर्ज दाखल करत असतात. या फ्लॅटच्या किमती तुलनेने कमी असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना म्हाडाची घरं घेण्याकडे कल असतो. याच मानसिकतेचा गैरफायदा घेऊन दलाल लोकांची फसवणूक करत असतात. अशीच एक घटना धारावीमधून समोर आली असून एका दलालाने सात ते आठ जणांनी सुमारे दीड कोटी रुपये गमावले. या दलालाने बनावट कागदपत्रे, म्हाडाच्या खोट्या पावत्या दाखवून विश्वास संपादन केला. सर्व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरुन धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई अग्निशमन दलातून निवृत्त झालेले कर्मचारी यांना स्वत:चे हक्काचे मुंबईत घर विकत घेयाचे होते. मात्र फार रक्कम जमा नसल्याने त्यांनी म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न सुरु केला. यावेळी एकाने आरोपी जितेंद्र शेलार नाव्याच्या एजंटसोबत निवृत्त कर्माचाऱ्याची ओळख करुन दिला. म्हाडाची घरे स्वस्तात मिळवून देतो, म्हणून शेलार यांने निवृत्त कर्मचारी सांगितले.

हे सुद्धा वाचा : 'या' दोन राज्यांमध्ये महाग झाले पेट्रोल-डिझेल, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

त्यानुसार निवृत्त कर्मचारी यांनी शेलारला 13 लाख रुपये दिले. धारावीच्या एमसीजीएम कॉलनीमधील एक घर त्याने निवृत्त कर्मचारी यांनी दिले. मात्र अन्य एका व्यक्तीने ही खोली आपली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शेलार याच्या सांगण्यावरुन निवृत्त कर्मचारी यांनी ती खोली सोडली. तर दुसऱ्या घरासाठी निवृत्त कर्मचारी यांनी आणखी 16 लाख रुपये शेलारला दिले. त्यानंतर शेलार याने खोट्या पावती, देकार पत्र दाखवसी. एवढं पैसे देऊनही घर काही दिले नाही. 

यासर्व प्रकारणानंतर म्हाडाच्या नावाखाली शेलार आपली फसवणूक करीत असल्याचा संशय निवृत्त कर्मचारी यांना आला. त्यांनंतर त्यांनी शेलार विरोधात माहिती जमा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, शेलारने आणखी काही जणांकडून पैसे घेतल्याचे समजले. सात ते आठ जणांकडून शेलार याने जवळपास दीड कोटी रुपये घेतल्याचे समोर आले. आपल्या सोब इतर लोकांचीही फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी निवृत्त कर्मचारी यांनी धारावी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आणि धारावी पोलिसांनी शेलार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Read More