Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई: दादरमध्ये अपघात, चालक गंभीर जखमी; वाहनाचा चक्काचूर

वाहतुकीचे नियम मोडत वेगाने आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्याप्रकरणी पोलीसांनी वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबई: दादरमध्ये अपघात, चालक गंभीर जखमी; वाहनाचा चक्काचूर

मुंबई: अती घाई संकटात नेई, अशी घोषवाक्ये रस्त्यावर पावलापावलाला दिसतात. पण, त्याचा बोध घेतील ते वाहनचालक कसले? वेगवावर नियंत्रन ठेवता न आल्याने मुंबईतील दादर परिसरात ह्युंडाई कार आणि दुचाकीत जोरदार अपघाद घडला. यात समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीचा जागीच चक्काचुर झाला. तर, वाहनचालकही गंभीर जखमी झाला.

रविवारी मध्यरात्री घडली घटना

दरम्यान, जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच, पोलिसांनाही घटनेबाबत माहिती दिली.

चालकांवर गुन्हा दाखल

दरम्यन, वाहतुकीचे नियम मोडत वेगाने आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्याप्रकरणी पोलीसांनी वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read More