Marathi News> मुंबई
Advertisement

गल्लीतल्या पाईप लाईन उद्घाटनावरून भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई

एकाच कामाचे उद्घाटन शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर आणि भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी केले.

गल्लीतल्या पाईप लाईन उद्घाटनावरून भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई

गणेश कवडे, झी मीडिया मुंबई : सत्तेत एकत्र असलेल्या भाजप-शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगरमध्ये पाईप लाइन कामाच्या भूमी पूजनावेळी पुन्हा एकदा भाजप शिवसेनेत श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. एकाच कामाचे उद्घाटन शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर आणि भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी केले. या सर्वात उपस्थित अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली.

दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर गल्ली नंबर 1 ते 14 या परिसर मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथले नागरिक यासाठी लढत आहेत. इथल्या नागरिकांची काम एकतर होत नाहीत. आणि झालीच तर मग पहील श्रेय कोणी घ्यायचं यात राजकीय पक्षांची भांडणे सुरु होतात. असाच एक प्रसंग दहीसरमध्ये घडला आहे. इथल्या पाइप लाईनच्या कामाच उद्घाटन करायच होतं. या उद्घाटनाला आपण दहा वाजता उपस्थित राहणार असल्याचे शिवसेना नगरसेविका  तेजस्विनी घोसाळकर यांनी जाहीर केले. तर भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी या उद्घाटनाला साडेनऊचा वेळ दिला. 

प्रत्यक्ष उद्घाटनाच्यावेळी नागरिकांची गर्दी जमली. अधिकारीदेखील पोहोचले. पहिला शिवसेनेचा ताफा आला. अगोदर म्हाडा दुरुस्त समितीचे अध्यक्ष माजी आमदार विनोद घोसाळकर आणि नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर उद्घाटनस्थळी उपस्थित झाले. यांच्याहस्ते पाइप लाईनच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. पाईप लाईनचे हे काम महानगरपालिकेचे आहे. या कामासाठीच्या सर्व परवानग्या महापालिकेने दिल्या. परंतु कोणी श्रेयसाठी काही करत असेल तर मला माहित नाही अशी प्रतिक्रिया नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी दिली आहे. शिवसेनेकडून घोषणाबाजी झाली. इतकं सर्व झाल्यावर शिवसेनेचे ताफा तिथून गेला. अधिकारी तिथेच उभे होते.

काही वेळातच आमदार आमदार मनीषा चौधरी यांनीही पाईपलाईनचे उद्घाटन केले. आमदारांच्या समर्थकांनाही जोरदार घोषणाबाजी केली. आ. मनीषा चौधरी यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला. हे काम पूर्ण होण्यासाठी मी सर्व परवगी घेतल्या हे तुम्हाला माहीत नाही का ? असे खडे बोल त्यांनी सुनावले. अशा सर्व गोंधळात दहीसरमध्ये प्रलंबित असलेले पाईप लाईनचे उद्घाटन पार पडले. 

Read More