Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई - दादर-सीएसटी वाहतूक पूर्ववत सुरू

पुलाचं काम सुरू असल्याने मागील ६ तासापासून ही वाहतूक बंद होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

 मुंबई - दादर-सीएसटी वाहतूक पूर्ववत सुरू

मुंबई : परळ-करी रोड पुलाचा गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे, काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ४.३० च्या सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. पुलाचं काम सुरू असल्याने मागील ६ तासापासून ही वाहतूक बंद होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

प्रवाशांची झाली कोंडी

दरम्यान, पुलाचं काम जलद गतीने पूर्ण झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे, मात्र या दरम्यान, दादर स्टेशनवर लोकांची मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी पाहायला मिळाली.

विक्रमी वेळेत

एलफिस्टन दुर्घटनेनंतर पुलाच्या कामांना वेग आला आहे, लष्कराने यापूर्वी आंबिवली पूल उभारला, यानंतर एलफिन्स्टन आणि आता करी रोडचा पूल उभारला आहे, अवघ्या सहा तासात हा पूल उभारला आहे.

Read More