Marathi News> मुंबई
Advertisement

धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.  

धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime News in Marathi: आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या वॉशरुममध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न करण्यात आला. ही महिला वकिल असून याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे. पीडित महिला कार्यालय असलेल्या लोकमान्य टिळक मार्गावरील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले नाही. ही घटना गुरुवार सकाळी 8 च्या सुमारास फोर्ट परिसरातील लोकमंत्य टिळक मार्गावर असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये घडला, जिथे पीडितेचे कामाचे ठिकाण आहे. 

कुठे घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय पीडित महिला वकील असून दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरजवळ तिचे ऑफीस आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास ही महिला शॉपिंग सेंटरमधील कॉमन वॉशरमध्ये गेली होती.त्यावेळी टॉयलेटमध्ये एक 21 वर्षांचा तरुण उपस्थित होता. महिलेने त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने बाहेर जाण्याचे नाटक केले, पण जेव्हा महिला शौचालयात गेली तेव्हा तो आरोपी पुन्हा आला.
महिला टॉयलेटमधून बाहेर आली असता आरोपी तीला बाहेर असल्याच दिसल. आरोपींनी दरवाजा आतून लावून घेतला होता. त्यानंतर आरोपीने महिलेचा विनयभंग केला आणि नंतर तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा सुरू केल्यानंतर त्याने महिलेच्या पोटावर लाथ मारली आणि तो पसार झाला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

आरोपीला अटक 

पीडित महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्या असता तिचा विनयभंग केला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलीस ठाण्याने आरोपी रामशंकर गौतम नावाच्या 31 वर्षीय वॉचमनला अटक केली आहे. आरोपी हा जवळच्याच कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध, प्राणघातक हल्ला आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Read More