Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांसाठी 10 दिवस महत्त्वाचे, डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

मुंबईकरांसाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार?

मुंबईकरांसाठी 10 दिवस महत्त्वाचे, डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

मुंबई: मुंबईसह उपनगर आणि राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं पुन्हा एकदा वाढत आहे. दुसरीकडे जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करायचं की नाही याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात आला आहे. अमरावतीमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांनी मात्र धोक्याचा इशारा देत सूचक वक्तव्य केलं आहे. 

मुंबईसह संपूर्ण राज्यात बुधवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे 8 हजार 807 नवे रुग्ण आढळून आले. यात मुंबईतील 1 हजार 167 रुग्णांचा समावेश आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या 80 मृत्यूंपैकी 27 मृत्यू हे मागील 48 तासांमध्ये झालेत.

कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का नाही हे पुढच्या 10 दिवसांमध्ये स्पष्ट होईल असं ते म्हणाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढ विदर्भामधून सुरु झाली आहे. 

या रुग्णवाढीमध्ये नवीन करोना विषाणूंचा स्ट्रेनचा सहभाग नसेल असं म्हणता येणार नाही अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. दोन महिन्यानंतर रुग्णालयामधील आयसीयू बेडसंदर्भातील विचारणा वाढल्याची माहितीही त्यांनी दिली.


अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 21 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या आणि कोरोना पॉझिटीव्ह रेटमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ 6 टक्क्यांची आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्या असल्याचं काकाणींनी स्पष्ट केलं आहे. 

मुंबईसह उपनगरांमध्ये नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाय़झरचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 

Read More