Marathi News> मुंबई
Advertisement

डॉक्टर जोडप्याचा मुंबईत अनोखा उपक्रम, सर्व डॉक्टरांनी अशी मोहिम सुरु केली तर किती बरं होईल....

काही लोकं माणूसकीच्या नात्याने गरजूं लोकांना त्यांच्या पातळीवरून मदत करण्यास पुढे येत आहे.

डॉक्टर जोडप्याचा मुंबईत अनोखा उपक्रम, सर्व डॉक्टरांनी अशी मोहिम सुरु केली तर किती बरं होईल....

मुंबई : संपूर्ण देशा बरोबरच महाराष्ट्रातही कोरोने हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सेवेवर त्याचा मोठा भार पडला आहे ज्यामुळे ऑक्सिजन, बेड्ससह इंजेक्शन सारख्या अनेक गोष्टींचा अभाव निर्माण झाला आहे. ज्यामुळे अनेक लोकांचे प्राणही गेले आहेत. अशात काही लोकं माणूसकीच्या नात्याने गरजूं लोकांना त्यांच्या पातळीवरून मदत करण्यास पुढे येत आहे. कोणी आपल्या वाहानातून मोफत रुग्णांना रुग्णालयात पोहचवत आहेत तर, काही लोकं जेवणाची सोय करत आहेत.

असंच एक माणूसकीचे उहाहरण महाराष्ट्राची राजधानी मुंबई मधून समोर आले आहे. येथे एक डॉक्टर जोडपं कोरोना संसर्गाने बरे झालेल्या लोकांकडून औषधे घेऊन त्यांना गरीब आणि गरजू रूग्णांना देत आहेत. मुंबई येथील हे डॉक्टर जोडपं गेल्या 10 दिवसांपासून या कामात व्यस्त आहेत आणि त्यांनी याद्वारे अनेकांना मदत केली आहे.

डॉक्टर मार्कस रन्नी (Dr. Marcus Ranney) म्हणाले की, "आम्ही हा उपक्रम सुमारे 10 दिवसांपूर्वी सुरू केला आहे. आम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांकडून त्यांची उरलेली औषधे घेतो आणि मग त्यांना मुंबईतील गरजू रूग्णांना देतो. बर्‍याच लोकांना असे वाटते की, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. परंतु त्यांना कोरोनाचे औषधे परवडत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत."

20 किलो औषधे जमा

डॉक्टर मार्कस रन्नी यांनी सांगितले की, "आता आम्हाला मुंबईतील 100 हून अधिक सोसायट्यांकडून औषधे पाठवली जात आहेत." डॉक्टर मार्कस आणि त्यांची पत्नी यांच्यासह आठ जणांची टीम या कार्यात सध्या गुंतली आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत आम्ही 20 किलो औषधे गोळा केले गेले आहेत. त्यानंतर एकत्रितपणे काम करुन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरजू लोकांना ते दिले जातील.

Read More