Marathi News> मुंबई
Advertisement

सत्तासंघर्ष शिगेला, मुंबई-ठाण्यात जमावबंदीचे आदेश

मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी 144 कलम लागू केलं आहे. जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. 

 सत्तासंघर्ष शिगेला, मुंबई-ठाण्यात जमावबंदीचे आदेश

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या गुप्त मतदानानंतर सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघाडी असं समीकरण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यावरून आता राज्यात काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहे. 

मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी 144 कलम लागू केलं आहे म्हणजेच पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

राज्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं असताना मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

आमदार, खासदारांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.  मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Read More