Marathi News> मुंबई
Advertisement

pics : मुकेश-नीता अंबानीने आकाश-श्लोकासाठी दिली सिक्रेट पार्टी

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा सध्या सुरु आहे. २४ मार्चला गोव्यात हिरे व्यापारी रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहतासह आकाशचा प्री-एंगेजमेंट सेरेमनी झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईत ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा सुरु झालेल्या या पार्टीत बॉलीवूड पासून क्रिकेटपर्यंतचे स्टार उपस्थित होते.

pics : मुकेश-नीता अंबानीने आकाश-श्लोकासाठी दिली सिक्रेट पार्टी

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा सध्या सुरु आहे. २४ मार्चला गोव्यात हिरे व्यापारी रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहतासह आकाशचा प्री-एंगेजमेंट सेरेमनी झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईत ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा सुरु झालेल्या या पार्टीत बॉलीवूड पासून क्रिकेटपर्यंतचे स्टार उपस्थित होते.

शाहरुख खान, कॅटरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन, किरण राव, करण जोहर सारखी बॉलीवूडची मंडळी उपस्थित होती. याशिवाय क्रिकेटर हरभजन सिंग, माजी क्रिकेटर झहीर खान, सागरिका घाटगेही उपस्थित होते. पार्टीदरम्यान पहिल्यांदा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता मीडियासमोर आले.

मुंबईत होणार साखरपुडा

आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा डिसेंबरमध्ये मुंबईत होणार असल्याचे बोलले जातेय. मात्र त्याआधी अँटिलियामध्ये यासाठी पार्टी ठेवण्यात आली होती. डिसेंबरमध्ये हे लग्न होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाची तारीख फिक्स झालीये. ८-१२ डिसेंबरदरम्यान लग्नाचा सोहळा पार पडेल. मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये सेरेमनी आयोजित करण्यात येईल. 

सर्वात आधी शाहरुख आणि कतरिना पोहोचले

या पार्टीत सर्वात आधी शाहरुख खान आणि कतरिना कैफ पोहोचले. त्यांनी आकाश आणि श्लोकाला शुभेच्छा दिल्या.

fallbacks

२६ वर्षीय आकाश मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. ईशा ही त्याची जुळी बहीण. अनंत हा सर्वात लहान मुलगा. श्लोका ही रसेल यांची छोटी मुलगी आहे. आकाश आणि श्लोका एकाच शाळेत शिकलेत. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

कतरिना कैफने आकाश-श्लोकाचे अभिनंदन केले

fallbacks

ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासह पार्टीत आली होती

fallbacks

जॉन अब्राहमनेही पार्टीत उपस्थिती दर्शवली.

fallbacks

सिनेनिर्माता करण जोहरसह किरण रावही पार्टीत आली होती.

fallbacks

माजी क्रिकेटर झहीर खान पत्नी सागरिकासह पार्टीला आला होता.

fallbacks

क्रिकेटर हरभजन सिंग मुकेश अंबानी यांच्या पार्टीत आला होता. 

fallbacks

Read More