Marathi News> मुंबई
Advertisement

शेजाऱ्याशी लग्न करण्यासाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या Mukesh Ambani यांच्या बहिणीची Love Story

पाच वर्षे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला

शेजाऱ्याशी लग्न करण्यासाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या Mukesh Ambani यांच्या बहिणीची Love Story

मुंबई : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असाणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रत्येकालाच कुतूहल वाटतं.  या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या न त्या कारणाने सतत प्रसिद्धीझोतात असतो. पण, एक सदस्य मात्र या साऱ्यापासून काहीशी दूर असल्याचं आजही पाहता येतं. 

करोडोंची संपत्ती, नाव हे सारंकाही मागे सोडून प्रेमाखातर मोठं पाऊल उचलणारी ही व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी यांची लहान बहीण दिप्ती साळगावकर. 

धीरुभाई अंबानी यांनी आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली, त्यावेळी ते एका इमारतीमध्ये राहत होते. मुंबईतील या इमारतीमध्ये वासुदेव साळगावकर हे त्यांचे शेजारी होते. पाहता पाहता साळगावकर आणि अंबानी कुटुंबाचं मैत्रीचं नातं दृढ झालं. वासुदेव साळगावर यांच्या निधनानंतर अंबानी कुटुंबानं त्यांचा मुलगा दत्तराज साळगावकर आणि त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. 

दत्तराज साळगावकर आणि अंबानींची मुलगी दिप्ती यांचं नातं पहिल्यापासूनच खास. कारण, पहिल्या नजरेतच ते एमेकांच्या प्रेमात पडले होते. पाच वर्षे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Mukesh ambanis sister Deepti Salgaocar lifestyle love story )

दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या या निर्णयाचं आनंदानं स्वागत केलं. पण, हे लग्न व्यवसाय, संपत्ती, प्रसिद्धी या निकषांच्या आधारे पार पडलं नसून, प्रेम आणि निस्वार्थ प्रेम हाच त्याचा पाया होता. एका मुलाखतीत खुद्द साळगावकर दाम्पत्यानंच ही बाब शेअर केल्याचं म्हटलं जातं. 

लग्नानंतर दत्तराज गोव्यात जाऊन त्यांचा व्यवसाय सांभाळू इच्छित होते. पण, सुरुवातीला दिप्ती यासाठी तयार नव्हत्या. पुढे मुंबईकर दिप्ती यांनी गोव्यात जाण्याचा निर्णय़ आनंदानं घेतला आणि इथरा राजाश्रय सोडून त्या गोव्यात स्थायिक झाल्या. तिथं जुळवून घेताना दीप्ती यांना बऱ्याच अडचणी आल्या. 

सुरुवातीच्या काळात त्यांना काही आव्हानांचा सामना कराला लागला, पण आपल्या निर्णयावर त्या ठाम होत्या. नव्यानं त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आणि पतीला पावलोपावली साथ दिली. प्रेमापुढं पैसा काय, सारं जगही ठेंगणं हे वाक्य या जोडीला आणि त्यांच्या प्रेमकहाणीला खऱ्या अर्थानं पूर्णपणे समर्पित आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Read More