Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai Rain : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, वातावरणात गारवा

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत पावसाला (Mumbai Rain) सुरूवात झाली आहे. 

Mumbai Rain : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, वातावरणात गारवा

मुंबई : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत पावसाला (Mumbai Rain) सुरूवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस बरसतोय. मुंबईतलं तापमान प्रचंड वाढलं होतं. सर्वसामान्यांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. घामाच्या धारेने वैतगलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (moonsoon update 2022 mumbai rain Heavy rain with thunder and lightning)

पावसाच्या सरीने मुंबईकरांना सुखद अनुभव मिळाला आहे. एकीकडे तळ-कोकणात पाऊस दाखल झाला आहे. तर मुंबईतही मान्सून पूर्व सरी बरसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आज पाऊस झाला आहे. पुणे, नाशिक, धुळे, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस बरसला आहे. त्यानंतर आता मुंबईत झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

दरम्यान येत्या 3-4 तासांत मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. 

Read More