Marathi News> मुंबई
Advertisement

अवघ्या ३६ तासांत मान्सून होणार पुन्हा सक्रिय

राज्याच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची देखील शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेच्या हवामान विभागानं सांगितलं. 

अवघ्या ३६ तासांत मान्सून होणार पुन्हा सक्रिय

पुणे: पुढच्या ३६ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय. त्यामुळे केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता पुढे सरकण्यासाठी अनुकुल परिस्थिती तयार झालीय. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या हवामानाच्या या स्थितीमुळे पुढील ४८ तासांनंतर दक्षिणेतील काही भागांत मान्सून शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवलीय. तर राज्याच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची देखील शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेच्या हवामान विभागानं सांगितलं. 

साताऱ्यातही पावसाचा शिडकाव

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वाऱ्यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाऊस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील 

पपई पिकाचं मोठं नुकसान

पपई पिकाचं मोठं नुकसान झालं असून शेकडो एकरातील पपई जमिनदोस्त झाली आहे. तर, जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरातही सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळं वाघोड, खानापूर तसच पुनखेडा या गावांमध्ये केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. हवेचा वेग जास्त असल्यानं रावेर बऱ्हाणपूर रस्त्यावर अनेक वृक्ष उन्मळून पडलेत.  पहिल्याच दिवशी हजेरी लावलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालायं.

Read More