Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांसाठी खूशखबऱ! शहराला पाणीपुरवठा करणारे दोन तलाव ओसंडून वाहू लागले, 7 धरणांची स्थिती काय?

Mumbai Rain: यंदाच्या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. आज पहाटेच्या मोजणीनुसार सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77 टक्के जलसाठा आहे.   

मुंबईकरांसाठी खूशखबऱ! शहराला पाणीपुरवठा करणारे दोन तलाव ओसंडून वाहू लागले, 7 धरणांची स्थिती काय?

Mumbai Rain: मुंबईला पाणीपुरवठा करणा-या 7 तलावांपैकी विहार व मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी विहार तलाव हा आज (25 जुलै 2023s) मध्यरात्री 3 वाजून 50 मिनिटांनी; तर मोडक सागर तलाव आज सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी गेल्याच आठवड्यात 20 जुलै 2023 रोजी तुळशी तलाव, तर काल 25 जुलै 2024 रोजी तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ आज एकाच दिवशी आणखी दोन तलाव पूर्ण भरून व ओसंडून वाहू लागले आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या 7  तलावांपैकी 4 तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.    

आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 2769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) एवढी आहे.  हा तलाव गतवर्षी सन 2023 मध्ये 26 जुलै रोजी रात्री 12.48 वाजता, 2022 मध्ये 11 ऑगस्ट रोजी आणि 2021 मध्ये 18 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता.

तर मोडक सागर तलाव गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात अर्थात 2023 मध्ये 27 जुलैला, 2022 मध्ये 13 जुलै आणि 2021 मध्ये 22 जुलैला ओसंडून भरून वाहू लागला होता. मोडक सागर तलावाची एकूण जलधारण क्षमता ही 12892.5 कोटी लीटर (128,925 दशलक्ष लीटर) आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या 7  धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे 6 वाजताच्या मोजणीनुसार सर्व 7 तलावांमध्ये मिळून 96639.5 कोटी लीटर (966,395 दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटरच्या तुलनेत 66.77  टक्के इतका आहे.

Read More