Marathi News> मुंबई
Advertisement

शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेल, आज फैसला

Sanjay Raut News Update : शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेलच याचा फैसला आज होणार आहे.  

 शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेल, आज फैसला

मुंबई  : Sanjay Raut News Update : शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेलच याचा फैसला आज होणार आहे. त्यांची ईडी कोठडी आज संपणार असून विशेष PMLA कोर्टात सुनावणी होईल. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडी त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी करणार आहे. तर राऊत यांचे वकील अर्थातच आधी न्यायालयीन कोठडी आणि नंतर जामीनाची मागणी करतील. मात्र जामीन अर्जावर आज लगेच फैसला होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं काल मुंबईत दोन ठिकाणी छापे मारलेत. या छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. संजय राऊत यांनी अलिबागमधील 10 फ्लॅट्स खरेदीसाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.  

एचडीआयएलच्या माजी अकाउंटंटचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. राऊतांच्या खात्यात ट्रान्सफर झालेल्या पैशांव्यतिरिक्त प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली होती. हा पैसा अलिबाग आणि मुंबई ईडीमधील फ्लॅट खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Read More