Marathi News> मुंबई
Advertisement

Raj Thackeray : शिवसेना कुणामुळे फुटली, त्याला जबाबदार कोण? राज ठाकरे म्हणाले..

शिवसैनिक,  भाजप की शरद पवार, शिवसेनेतील बंडाला जबाबदार कोण? पाहा काय म्हणाले राज ठाकरे? 

Raj Thackeray : शिवसेना कुणामुळे फुटली, त्याला जबाबदार कोण? राज ठाकरे म्हणाले..

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तानाट्य घडलं. शिवसेनेच्या (Shiv Sena) तिकीटावर निवडून आलेले आमदारांनी भाजपला (Bjp) साथ दिली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत ही फुट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी याला भाजपला जबाबदार धरलं, तर कोणी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना फुटण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच जबाबदार धरलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर हा निशाणा साधला. (mns raj thackeray said that uddhav thackeray is responsible for rebellion in shiv sena)

राज ठाकरे काय म्हणाले?

"त्या दिवशीच माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय नका घेऊ नका. ते हसायला लागले जोरात. जी गोष्ट घडली आहे, ती गोष्ट नाही तुम्ही घडवली ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली.  याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता", असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हटलं. 

Read More