Marathi News> मुंबई
Advertisement

मनसेचा नवा झेंडा, नवा विचार आणि नवी वाटचाल

मनसेची नवी सुरुवात...

मनसेचा नवा झेंडा, नवा विचार आणि नवी वाटचाल

मुंबई : नवा झेंडा, नवा विचार आणि नवी वाटचाल घेत हिंदुत्वाचं नाणं खणखणीत वाजवत मनसेनं नवी सुरुवात केली आहे. भगवा हा मनसेचा नवा रंग आणि त्यावर विराजमान शिवरायांची राजमुद्रा. या फडकत्या नव्या भगव्या निशाणानं मनसेमध्ये नवा जोश आणि नवी दिशा भरली आहे.

मनसेच्या या नव्या दिशा आणि नवा झेंडा समोर आल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिय़ा ही येत आहेत. झेंडे आणि कपडे बदलून फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.

दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांची देखील राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाली आहे. पक्षात त्यांना कोणती मोठी जबाबदारी मिळते याबाबत कार्यकर्त्यामध्ये ही उत्सुकता आहे. पण यासोबतच त्यांच्या समोर राजकीय प्रवास सुरु करत असताना अनेक आव्हानं देखील असणार आहेत.

२००६ ला शिवसेनेतून मनसेचा जन्म झाला, त्यावेळी हिंदूंसाठी भगवा, मुस्लिमाना सामावण्यासाठी हिरवा आणि दलितांचं प्रतिनिधित्व करणारा निळा असा झेंडा होता. मग त्यावरच्या इंजिनानं दोन वेळा दिशा बदलली. बऱ्याच स्थित्यंतरांनंतर आता अख्खा झेंडा भगवा झाला आहे. मनसेच्या इंजिनानं राईट टर्न घेतला आहे. तो पक्षाला नवसंजीवनी देणार का हे येणारा काळच ठरवेल.

Read More