Marathi News> मुंबई
Advertisement

एकीकडे मनसेचा नवा झेंडा, तर दुसरीकडे या नव्या गड्यांचं चाललंय तरी काय?

मनसेचं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरु आहे. यावेळी मनसेच्या झेंड्याचं अनावरण झालं, या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा झळकली. तसेच

एकीकडे मनसेचा नवा झेंडा, तर दुसरीकडे या नव्या गड्यांचं चाललंय तरी काय?

मुंबई : मुंबईत गोरेगावमध्ये मनसेचं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरु आहे. यावेळी मनसेच्या झेंड्याचं अनावरण झालं, या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा झळकली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे झेंडा झळकवताना दिसून आले. 

अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे.

ट्वीटमधील फोटोमध्ये आदित्य ठाकरे आणि रोहित पवार विचार विनिमय करताना दिसत आहेत. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्याचे नवे नेतृत्व कामाला लागलंय.! असं लिहून रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे.

एकंदरीत राजमुद्रा आणि किल्ल्यांचं गडसंवर्धन असे सर्व विषय हे शिवरायांशी संबंधित आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हे शिवरायांशी संबंधित विषयांवर केंद्रीत असल्याचं दिसून येत आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी इंदूमिलची पाहणी करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकरात लवकर बांधण्याचा चंग बांधलेला दिसतोय. 

यावरून राज्यात महापुरूषांशी आणि त्यांच्या अस्मितेशी जोडलेल्या लोकांशी संबंधित विषय हाताळले जात असल्याचंही स्पष्ट होत आहे.

Read More