Marathi News> मुंबई
Advertisement

लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

MNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक   

लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आता पंतप्रधान पदाकरिताचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी होणार आहे. असं सगळं असताना महाराष्ट्राच्या राजकारणाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं आणि आता निकालानंतरही हेच राजकारण दिसत आहे. असं असताना आज महाराष्ट्रातील अनेक पक्ष आपल्या बड्या नेत्यांसह महत्त्वाची मीटिंग घेताना दिसत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांसह बैठक घेणार आहेत.

आज सकाळी 9 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ही मनसेची पहिलीच बैठक आहे. मनसेचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थीत राहणार आहेत. विधासभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सा-यांचं लक्ष लागलंय आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. याची पहिली सभा नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत आले होते. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना विजय मिळाला. निकालानंतर नारायण राणे यांनी शिवतीर्थावर निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेऊन आभार मानले. 

महायुतीमधील घटक पक्षाची  बैठक 

लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर आज महायुतीमधील घटक पक्षाची बैठक मुंबईत आहे. या बैठकीत विचार विनिमय होणार असल्याचं बोललं जातं आहे. सकाळी 11.00 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. 

काँग्रेसची बैठक 

मुंबईत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. टिळक भवन दादर इथे दुपारी 1 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व नवनियुक्त खासदारांची बैठक होणार आहे. 

NDA च्या सत्तास्थापनेबाबत बैठक

NDA आज सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. सकाळी 11 वाजता NDAच्या घटकपक्षांची संसदीय दलाची बैठक होणार आहे. त्यात नरेंद्र मोदींची NDAचे नेते म्हणून निवड करण्यात येणार आहे. मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि एकमताने मोदींची नेतेपदी निवड करण्यात येईल. यावेळी भाजप आणि NDAतील घटकपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहे. मोदींची नेतेपदी निवड झाल्यानंतर सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तर संध्याकाळी NDAचे नेते राष्ट्रपतींकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील.

Read More