Marathi News> मुंबई
Advertisement

कोरोना रुग्णांसाठी मुंबईत हॉस्पिटल उभारणीला सुरुवात

कोरोनाचा सामना करण्यासाठी एमएमआरडीएने हॉस्पिटलच्या बांधणीला सुरुवात केली आहे.

कोरोना रुग्णांसाठी मुंबईत हॉस्पिटल उभारणीला सुरुवात

मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी एमएमआरडीएने हॉस्पिटलच्या बांधणीला सुरुवात केली आहे. बीकेसीच्या मैदानामध्ये १ हजार बेडचं हॉस्पिटल एमएमआरडीए उभारणार आहे. भविष्यात गरज पडली तर या रुग्णालयात ५ हजारांपर्यंत बेडची सोयही करता येणार आहे.

एमएमआरडीएने निर्माण केलेल्या या नॉन क्रिटिकल म्हणजेच तब्येत गंभीर नसलेल्या रुग्णांसाठीच्या विलगीकरण सुविधेमुळे वैद्यकीय सेवांवर पडलेला ताण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. 

बीकेसीमध्ये उभारण्यात येणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये १ हजार बेडपैकी ५०० बेडवर ऑक्सिजनची सोय असेल. या हॉस्पिटलच्या उभारणी चा पूर्ण खर्च हा एमएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. या सुविधेसाठी आरेखन आणि तांत्रिक सहाय्य ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलकडून सीएसआरमधून उपलब्ध करून देण्यात आलं आहे. 

Read More