Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याचा कॉल आला आणि....

मुंबई  शहरात एक धक्कादाय घटना घडली. काल रात्री पावणेबाराच्या सुमाराला मुंबईत बॉम्बच्या फोनमुळे यंत्रणांची पळापळ झाली.  

मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याचा कॉल आला आणि....

मुंबई : शहरात एक धक्कादाय घटना घडली. काल रात्री पावणेबाराच्या सुमाराला मुंबईत बॉम्बच्या फोनमुळे यंत्रणांची पळापळ झाली. पण तपासाअंती ही अफवाच असल्याचे उघड झाले. 

रात्री ११.४० वाजता मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात अज्ञात नंबरावरून फोन आला. पुढील ५ मिनिटांत आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे आमदार निवास सुरक्षा व्यवस्था, पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. 

श्वानपथक, बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने आमदार निवासात राहणाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. दोन तास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर रात्री पावणेदोन वाजता हा दिशाभूल करणाऱा कॉल असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तिचा नंबर ट्रेस केलाय. त्याचा शोध सुरू आहे. 

Read More