Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार

मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. 

मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबादमधील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच ज्या ज्या  बांधकाम व्यवसायिकांनी म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखळ करण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोठे असणार म्हाडाची घरे?

- मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबादमधील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार 
- मुंबईतल्या 107 व्यवसायिक गाळे, 238 घरांची लॉटरी लवकरच 
- पुणे विभागात 4664 घरांची लॉटरी 20 ते 21 मार्चला जाहीर होणार, 27,28 एप्रिलला लॉटरी निघणार
- नाशिकमध्ये 1000 घरांची लॉटरी
- औरंगाबादमध्ये 800 घरांची लॉटरी
- कोकण मंडळाची 9000 घरांची लॉटरी आचारसंहिते नंतर होणार 
- कल्याण डोंबिवली आणि खोणी, अंतरली इथे ही 9000 घरं असणार आहेत 
- सातवा वेतन आयोग म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच लागू होणार.
- 130 कोटी ज्या ज्या  बांधकाम व्यवसायिकांनी म्हाडाचे थकवले आहेत त्यांच्या एफ आय आर दाखल करणार.

Read More