Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

घराचं स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्यांना म्हाडाने दिली खुशखबर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

मुंबई : मुंबईत घराचं स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्यांना म्हाडाने खूशखबर दिली आहे. मुंबईत म्हाडाच्या ३०१५ घरांसाठी लॉटरी निघणार आहे. २०२३च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल. मुंबईतल्या गोरेगाव इथल्या पहाडी इथल्या घरांसाठी ही लॉटरी असून विशेष म्हणजे या इमारतीचं ७० टक्के काम पूर्ण झालं आहे. बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ही माहिती दिली.

दुर्बल घटकांसाठी किती घरं?
३ हजार १५ घरांपैकी दुर्बल घटकांसाठी १ हजार ९४७ घरं असणार आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी ७३६ घरं आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी २२७ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १०५ घरं उपलब्ध असणार आहेत. वन रुम किचन २५ लाख रुपयांच्या आत घेता येणार आहे. 

MMR क्षेत्रात गृहप्रकल्प
असेच प्रकल्प MMR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प साकारण्याचा म्हाडाचा विचार आहे. तसंच पुण्यालाही १०० एकर जागा घेतली असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ठाण्यातही परवडणारी घरं बांधली जात असून सातारा, सोलापूर, सांगली आणि मिरज इथे इमारती बांधून सामान्यांच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Read More