Marathi News> मुंबई
Advertisement

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

माटुंगा ते मुलुंड दरम्यान गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम या रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे.  हार्बरच्या वडाळा रोड ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव मार्गावर ब्लॉकची कामं करण्यात येणार आहे.

माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर सकाळी १०.३० ते ३ पर्यंत ब्लॉक असणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. 

वडाळा रोड ते वाशी स्थानकांदरम्यान अप-डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत ब्लॉक असेल. दरम्यान, सीएसएमटी - वाशी, बेलापूर, पनवेल - सीएसएमटी अप-डाउन गाड्या बंद असणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल- वाशी -पनवेल विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.  

सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन धीम्या  मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. अप-डाउन मार्गावरील धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

  

Read More