Marathi News> मुंबई
Advertisement

माथेरानची राणी नेणार पुन्हा अनोख्या सफरीवर, तुम्ही तयार आहात ना?

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. माथेरानमध्ये पर्यटकांची आणखी वर्दळ वाढणार आहे. मिनी ट्रेनला रूळावर आणण्यासाठी दिवसाला २०० स्लीपर आणि रेल गर्डर बदलण्यात येत आहेत. 

माथेरानची राणी नेणार पुन्हा अनोख्या सफरीवर, तुम्ही तयार आहात ना?

कर्जत : नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. माथेरानमध्ये पर्यटकांची आणखी वर्दळ वाढणार आहे. मिनी ट्रेनला रूळावर आणण्यासाठी दिवसाला २०० स्लीपर आणि रेल गर्डर बदलण्यात येत आहेत. 

2019 मध्ये मोठ्या पावसामुळे माथेराण ते अमनलॉज दरम्यान मिनी ट्रेनच्या मार्गाचे मोठ नुकसान झाले होते. त्यानंतर ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम गेल्या 2 वर्षापासून सातत्याने सुरू आहे. लवकरच नेरळ ते माथेरान मिनीट्रेन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या अमन लॉज ते माथेरान अशी मिनी ट्रेन धावतेय. नेरळ ते अमन लॉज दरम्यानची सेवा 2019 पासून विविध सुरक्षा कामांसाठी बंद करण्यात आली होती. 2019मध्ये पावसाळ्य़ात मिनी ट्रेनच्या ट्रॅकची मोठी हानी झाली होती. 

मिनी ट्रेनचं मजबुतीकरण करण्यासाठी सुमारे 60 कामगार रोज काम करत आहेत. नोव्हेंबर 2022 पर्यंत नेरळ माथेरान ट्रॅकची दुरूस्ती पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. 

Read More