Marathi News> मुंबई
Advertisement

नवी मुंबईत अग्नीतांडव ! पावणे MIDC तल्या रासायनिक कारखान्याला भीषण आग

आसपासच्या कंपन्यांमध्ये आग वेगाने पसरत असून काही कामगार अडकल्याची भीती

नवी मुंबईत अग्नीतांडव ! पावणे MIDC तल्या रासायनिक कारखान्याला भीषण आग

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या (Navi Mumbai) पावणे MIDC तल्या एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागली आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब या केमिकल कंपनीत आग लागली आणि काही क्षणातच आगीने प्रचंड रुप धारण केलं. वेगाने पसरणाऱ्या आगीच्या वेढ्यात आसपासच्या सात कंपन्याही आल्या. 

आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून गर्दी न करण्याचं आणि अफवा न पसरवण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

आग लागलेल्या कंपनीत काही कामगार अडल्याची भीती वर्तवली जात आहे. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Read More