Marathi News> मुंबई
Advertisement

Mansukh Hiren death case | सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली : अनिल देशमुख

 पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांनी केली होती.  त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात निवेदन दिले आहे.

Mansukh Hiren death case | सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली : अनिल देशमुख

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विधानसभेत आजही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आज विधिमंडळाचा शेवटचा दिवस होता. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांनी केली होती.  त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात निवेदन दिले आहे.

'गुन्हेगाराला जात, धर्म पंथ नसतो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2019 ते 2020 या वर्षात राज्यातील गुन्हेगारीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. राज्यात 1 लाख लोकसंख्येमागे गुन्ह्यांची संख्या इतर राज्यांपेक्षा कमी आहे. राज्यात 2019च्या तुलनेत 2020 मध्ये गुन्ह्यातील संख्येत घट झाली  आहे. 

सचिन वाझेंच्या बाबतीत विरोधकांची मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, सचिन वाझे असो वा कोणीही सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, सचिन वाझे सध्या क्राईम काम करीत आहेत. तेथून  त्यांना दूसऱ्या विभागात हलवण्यात येणार असल्याची घोषणा मी करीत आहे' , असे अनिल देशमुख यांनी म्हटले  आहे.

 

Read More