Marathi News> मुंबई
Advertisement

मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.

 मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maratha Reservation : अंतरवाली-सराटीत 1 सप्टेंबरला लाठीचार्ज झाला आणि मराठा आंदोलन पेटलं. मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाल बसले. 17 दिवसांनंतर राज्य सरकारला त्यांची मनधरणी करण्यात यश आलं. जरांगेंनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली. मात्र अल्टिमेटम संपल्यानंतरही जरागेंची सरसकट मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही आणि आता ते पुन्हा उपोषणाला बसलेत. मात्र सरकारनं जरांगेंकडून जो 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता त्यात नेमकं काय काय घडलं पाहुयात.

'त्या' 40 दिवसात काय घडलं? 
15-20 ऑगस्ट - जरांगे उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल

21-23 ऑगस्ट - जरांगेंचा अंतरवाली-सराटीत मुक्काम

24 ऑगस्ट  ते 12 सप्टेंबर - मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जरांगेंचा दौरा

14 सप्टेंबर  -  अंतरवालीत मराठा समाजाचा लाखोंचा मेळावा, मेळाव्यामुळे सरकार हादरलं

24 ऑक्टोबर - चौंडीतल्या धनगर आरक्षणाला जरांगेंचा पाठिंबा

25 ऑक्टोबर - पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात

तर सरकारकडून याच काळात कशापद्धतीनं प्रयत्न सुरु होते.. पाहुयात. 3 सप्टेंबरला न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना झाली, त्यानंतर समितीनं मराठा-कुणबी पुराव्यांसाठी हैदराबादचे दौरे केले

'त्या' 40 दिवसात काय घडलं?
न्या.शिंदे समितीकडून हैदराबादचे दौरे करण्यात आले.  यात 5000 कुणबी दस्ताऐवजांचे पुरावे मिळाले.  मात्र ही कागदपत्रं पुरेशी नसल्यानं समितीकडून मराठवाड्यातील 8 जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पुरावे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. 30 सप्टेंबरपर्यंत पुरावे गोळा करण्याचे शिंदे समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 

मनोज जरांगे उपोषणावर ठाम
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केलीये त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान जरांगेंनी अन्न-पाणी,औषधं घेणार नसल्याचं जाहीर केलंय गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असं आवाहन जरांगेंनी गावकऱ्यांना केलं आहे. उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेनं करा, आत्महत्या करू नका, असंही जरांगेंनी म्हटलंय.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोणीतरी अडवत असल्याचा आरोप जरांगेनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामाणिक आहेत. मात्र कोणीतरी अडवत असल्याने मुख्यमंत्री आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. त्यामुळे आरक्षणापासून मुख्यमंत्र्यांना अडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

Read More