Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईत दिवसा लहानग्या मुलीची छेड

अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी. तुमच्या आमच्या घरातल्या लहानग्यांशी संदर्भात ही बातमी. मुंबई सेंट्रल पुलावर घडलेली एक घटना. त्यात नराधमानं केलेलं कृत्य प्रचंड चीड आणणारं होतं. 

मुंबईत दिवसा लहानग्या मुलीची छेड

मुंबई : अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी. तुमच्या आमच्या घरातल्या लहानग्यांशी संदर्भात ही बातमी. मुंबई सेंट्रल पुलावर घडलेली एक घटना. त्यात नराधमानं केलेलं कृत्य प्रचंड चीड आणणारं होतं. 

मुंबई सेंट्रल स्थानकावरचा पूल. शाळेतल्या दोन लहानग्या मुली त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहात उभ्या होत्या. पुढे जे घडलं ते अत्यंत संतापजनक होतं. एक व्यक्ती येते. हातातील सामान खाली ठेवतो आणि मुलींना हात लावतो. सामान घेऊन परत जातो.

दोन मुली पूलावर उभ्या असताना एक नराधम तिथे आला. मुलींना पाहून त्यानं हातातलं सामान खाली ठेवलं. पुढे आला आणि लहानग्या मुलीला पाठीमागून स्पर्श केला.तो तिथून सामान उचलून निघून गेला. चक्क त्या मुलींची छे़ड काढण्याच्या हेतूनेच त्याने हातातलं सामान काही अंतरावर ठेवलं. मुलींसोबत कोणीच नसल्याचा अंदाज घेत त्यांच्या जवळ येऊन त्यांतल्या एका मुलीची छेड काढून पुन्हा आपलं सामान घेऊन तो शांतपणे निघून गेला.

मुली एवढ्या लहान होत्या की त्यांना नेमकं काय घडलं, त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे सुद्धा उमगलं नाही.या मुलींनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतलंय. 

मुलींनो, तुमच्याबाबत असं काहीही घडलं तरी आरडाओरडा करा. पालकांनो, मुलींना याबाबतीत सजग करा. या असल्या नराधमांना कठोर शिक्षा मिळायलाच हवी. लहानग्यांची सुरक्षा ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे आजूबाजूला लक्ष ठेवा, असले नराधम दिसले तर त्यांना वेळीच धडा शिकवा. 

Read More