Marathi News> मुंबई
Advertisement

परळमध्ये गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

परळमध्ये गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

मुंबई: परळच्या प्रीमियर टॉकीज परिसरातील एका गोदामाला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागली. एका रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर हे गोदाम आहे. या गोदामात घडाळ्यांचा साठा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि तीन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. इमारतीमधील बहुतांश रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याचे समजते. यानंतरही इमारतीमध्ये कोणी अडकून पडले आहे का, याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. 

या परिसरात उभारलेला मंडप आणि बघ्यांच्या गर्दीमुळे अग्निशमन दलाला आग विझविण्यात अडथळे येत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

Read More