Marathi News> मुंबई
Advertisement

महिला पोलिसांसाठी आनंदाची बातमी, पोलीस महासंचालकांनी सरकारकडे केली ही मागणी

महिला आयोगाने पाठपुरावा करण्याची पोलीस महासंचालक संजय पांडे यांची मागणी

महिला पोलिसांसाठी आनंदाची बातमी, पोलीस महासंचालकांनी सरकारकडे केली ही मागणी

मुंबई : पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांवर कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचा भारही असतो. अशात सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेकदा ८ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांची कौटुंबिक जबाबदारी आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे महिला पोलिसांवरचा मानसिक ताण वाढत आहे. 

या पार्श्वभूमीवर महिला पोलिसांना ८ तास ड्युटी करण्यासाठी महिला आयोगाचा पाठिंबा हवा अशी मागणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केली आहे. मात्र हा बदल घडवण्यास आपण एकटे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी महिला आयोगानंही पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमच्याकडे किती तरी महिला पोलीस आहेत त्यांना २४ तास ड्युटी आहे. पण अजून आम्ही महिलांना ८ तास ड्युटी करू शकलो नाही. राज्यात काही ठिकाणी महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी झाली आहे. पण अनेक ठिकाणी अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. 

महिला पोलीसांना ८ तास ड्युटी करण्यासाठी मला महिला आयोगाचा पाठिंबा पाहिजे, मी एकटा पडतोय अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली आहे. 

मला नगरच्या एका महिला कॉन्स्टेबलचा फोन आला ती सांगत होती, साहेब चार दिवस मी ड्युटी करतेय, हा बदल करायला एक संजय पांडे पुरेसा नाही, महिला आयोगाने याचा पाठपुरावा करायला हवा असं संजय पांडे यांनी म्हटलं आहे.

महिलांसाठी शौचालयाची सुविधा नाही
नायगाव पोलीस स्टेशन आहे तिथे महिलांसाठी शौचालय नाही, पोलीस स्टेशनमध्ये किमान एक महिला शौचालय असायला हवं अशी मागणीही संजय पांडे यांनी केली आहे.

दुसरा एक विषय आहे एकत्रीकरणाचा, नवरा सोलापूरमध्ये असतो तर पत्नी नागपूरात त्यांना आपण एका ठिकाणी ड्युटी देऊ शकत नाही, याकडेही संजय पांडे यांनी लक्ष वेधलं आहे.

Read More